आवेदन पत्र भरताना सूचना

Ayurved Vyaspeeth    21-Jun-2023
Total Views |

निवास व अन्य व्यवस्थांच्या मर्यादांचा विचार करत निवडक विद्यार्थी-संख्या निश्चित करुन त्यांना गुरुकुलासाठी प्रवेश दिला जाईल. यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी आवेदन-पत्र (form) भरणे आवश्यक आहे. ज्यांनी आवेदन पत्रे भरली आहेत, त्यांच्यातून निवडप्रक्रियेद्वारे नियोजित संख्ये-एवढ्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल. या विद्यार्थ्यांनी गुरुकुलाचे शुल्क भरून पुढे गुरुकुलामध्ये सर्व दिवस निवासी राहून शिक्षण घेणे अपेक्षित आहे. त्यांच्यासाठीच्या विशेष सूचना गुरुकुलापूर्वी सांगण्यात येतील.

  1. आवेदन-पत्रासह नोंदणी शुल्क १००/- भरणे अपेक्षित आहे. 
  2. आवेदनपत्र (form) भरताना प्रत्येक प्रश्न नीट वाचून विचारपूर्वक उत्तरे लिहावीत. त्या उत्तरांच्या आधारे विद्यार्थ्यांची निवड केली जाणार आहे. ही उत्तरे मराठी भाषेमध्ये व देवनागरी फॉंट-मध्ये लिहावीत.
  3. विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या संपर्क क्र. (phone number) & E-mail id वर पुढील सर्व सूचना पाठविण्यात येतात, त्यामुळे तो व्यवस्थित लिहावा.
  4. अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांपैकी मुलाखतीद्वारे निवडक विद्यार्थ्यांची गुरुकुलासाठी निवड करण्यात येईल. त्या संदर्भात अधिक माहिती योग्य वेळी संबंधित विद्यार्थ्यापर्यंत पोहोचविण्यात येईल. निवड प्रक्रिया व त्यामध्ये यथावश्यक बदल करण्याचे अधिकार व्यवस्थापन समितीकडे असतील.
  5. निवड झालेल्या विद्यार्थ्यांसाठी गुरुकुलचे शुल्क १९,०००/- असेल. ते भरण्याबद्दलच्या सूचना निवड झालेल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यात येतील.
  6. आवेदन-पत्र भरण्याचा अंतिम दिनांक १० डिसेंबर २०२३ आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांची यादी २५ डिसेंबरपर्यंत घोषित येण्यात येईल.

विद्यार्थी गुरुकुल आवेदन पत्र