अध्यापक मराठी भाषेतूनच सूत्रांचे स्पष्टीकरण करणार आहेत. हिंदी मध्ये प्रत्येक वेळी पुन: स्पष्टीकरण करणे / सारांश सांगणे वेळेअभावी शक्य होणार नाही. मराठी व्यवस्थित समजत असल्यास जरुर प्रवेश घ्यावा. व्यवहाराला अडचण येणार नाही.

आवेदन पत्र ( form) वेळेत व पूर्ण विचार करुन लिहून submit करणे आवश्यक आहे. प्रश्नांची उत्तरे देवनागरी लिपीतच लिहावीत. आवेदन पत्रात तुम्ही लिहिलेली उत्तरे निवड करताना विचारात घेतली जाणार आहेत.

निवडक विद्यार्थ्यांची on-line पद्धतीने मुलाखत घेण्यात येईल. त्याच्या सूचना संबंधित विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात येतील. संपूर्ण प्रक्रियेत निवड समितीचा निर्णय अंतिम असेल.

गुरुकुल शुल्क रु. १९,००० /- फक्त (१८ दिवसांच्या निवास व भोजनव्यवस्थेसाठी)

निवड झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश शुल्क भरण्यापूर्वी याविषयी पूर्ण कल्पना(Cancellation Policy) देण्यात येईल.

नाही. एकदा गुरुकुल चालू झाले की त्यानन्तर अत्यंत अपरिहार्य कारणाशिवाय व व्यवस्थापकांच्या परवानगी शिवाय गुरुकुल स्थान सोडता येणार नाही.

गुरुकुल स्थानी म्हणजेच रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी, उत्तन, भाईंदर येथे येण्या-जाण्याची व्यवस्था विद्यार्थ्यांना स्वत:च करायची आहे. Google map link व detail address निवड झालेल्या विद्यार्थ्यांना पाठविण्यात येईल. एकदा निवासस्थानी पोहोचले की सर्व व्यवस्था एकाच campus मध्ये आहे.

होय. विद्यार्थ्याबरोबर सर्व दिवस पूर्ण वेळ किमान एक स्त्री अध्यापक / coordinator असेल.

निवास स्थान पूर्ण सुरक्षित आहे. ओळखपत्र दाखविल्याशिवाय कोणालाही प्रवेश दिला जात नाही. Room, lecture hall, corridors, dinning hall सर्व ठिकाणे व्यवस्थित स्वच्छ केलेली असतात.

एका खोलीमध्ये चार विद्यार्थी असतील. मुले व मुलीं साठी स्वतन्त्र व्यवस्था असेल.

गुरुकुल काळात फोनचा कमीत कमी वापर करणे अपेक्षित आहे. सत्राचे वेळी फोन वापरता येणार नाही. आवश्यक तेवढे संपर्क करण्याइतपत range नक्की आहे.

शाकाहारी भोजनाची स्वच्छ, उत्तम व्यवस्था आहे. दोन वेळा चहा , दोन वेळा नाष्टा, दोन वेळा जेवण नियोजित आहे.

पहाटे पाच ते रात्री दहा वाजेपर्यंत पर्यंत - पाठान्तर, योगाभ्यास, अध्ययन, टीका वाचन, अनौपचारिक चर्चा अशी सत्रे असतील. दिवसभरात भोजन व थोडी विश्रान्ती यासाठी पुरेसा अवधी आहे.

परीक्षा झाल्यानंतर तुम्हाला लगेच उपक्रमात सहभागी होता येईल. शक्य झाल्यास आधीच्या दिवसांचे recording देण्याचा प्रयत्न करू. त्या दिवसांचे शुल्क परत दिले जाऊ शकणार नाही.

गुरूकुल चालू असताना अशी परवानगी मिळत नाही. आवश्यकतेनुसार पालकांशी फोनवर संपर्क करावा.

माहिती पत्रकात दिलेले फोन क्रमाङ्क वा तेथे गेल्यावर तेथे असणाऱ्या Co-ordinators चे क्रमाङ्क विद्यार्थ्यांना दिले जातील. ते त्यांनी पालकांना कळविणे अपेक्षित आहे. केवळ तातडीच्या कामासाठीच त्यांना संपर्क करावा. सामान्य बाबींसाठी त्यांना त्रास देऊ नये.

विद्यार्थ्यांना नेहमी होणारे आजार व त्यासाठीची औषधे त्यांनी जवळ ठेवावीत. तेथे ऐनवेळी होणाऱ्या आजारपणांसाठी प्राथमिक स्वरूपाच्या उपचारांची व्यवस्था असेल. तेथे उपचार शक्य नसल्यास पालकांशी संपर्क करून जवळच्या रुग्णालयात स्वखर्चाने व्यवस्था होऊ शकते